Donation FAQs

Donation FAQs:

Does Paani Foundation accept donations directly?

Paani Foundation is fully funded and does not accept individual contributions.

What is Snehalaya?

Snehalaya is a Non-Governmental Organisation (NGO) based in Ahmednagar. It has since 1991 been doing stellar work on women empowerment, child welfare and agriculture and has been involved with the Water Cup since its outset.

Why has Paani Foundation tied up with Snehalaya?

Paani Foundation's mandate is to use communication to create a people's movement to fight drought. Paani Foundation does not directly fund villages in cash or kind. However, villages do require assistance in the form of machines. This year, Snehalaya has come forward to offer help in the form of earth moving machines to villages that take the lead in shramdaan (voluntary manual work) in the Water Cup. Those who want to support this massive effort can donate by clicking here.

Why are machines necessary for watershed management work?

While many structures for localised watershed management can be built with manual labour, machines greatly improve the speed, scale and efficacy of this work.

Will Snehalaya offer machine help to all villages?

No. Snehalaya will offer machine help only to those villages that complete a minimum threshold amount of work (20 marks) in the competition. The number of villages receiving this help will depend on the funds that Snehalaya is able to mobilise for this purpose. The greater the sum raised through donations, the larger the number of villages that will receive help through machines.

If the number of villages that are eligible for machine support is larger than the number that can be supported through the donations made for this purpose, how will Snehalaya select the villages that will receive machines?

Snehalaya will select the villages by lots so that every eligible village has an equal chance of getting machine support.

Can I specify that my money should be used only for a particular village, taluka or district?

No.

Can a foreign contribution be made to Snehalaya?

Yes, but only if you donate to its FCRA account. You will need to specify that the donation is for the Water Cup villages, and send an email to support@snehalaya.org informing them about your donation.

Can I get tax exemption under Section 80G for my donation?

Indian tax payers are entitled to 80G Income Tax exemption. If you want to obtain a receipt for tax exemption, please email support@snehalaya.org with the following information:
1) Full name, address, email ID and telephone number
2) PAN number
3) Amount of donation

Please write 'Donation for Water Cup villages' in the subject line.

Can I donate to an organisation other than Snehalaya through Paani Foundation?

No.

For Indian donors: To pay online via Credit/Debit card, NEFT/Bank transfer or UPI, click on the Donate button below. A nominal convenience fee (payable to the service provider) applies for all payment options except NEFT/Bank transfer.
For payment in International Currencies or to send a cheque, please click here.

 

देणगीविषयी प्रश्नोत्तरे:

पानी फाउंडेशनकडून देणगी स्वीकारली जाते का?

पानी फाउंडेशन वैयक्तिक देणगी स्वीकारत नाही.

स्नेहालय काय आहे?

स्नेहालय ही अहमदनगर स्थित NGO आहे. स्नेहालय या संस्थेची स्थापना १९९१ मध्ये झाली. महिला सक्षमीकरण, बाल-कल्याण आणि शेती या क्षेत्रांत स्नेहालयाने अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. सत्यमेव जयते वॉटर कप प्रक्रियेत स्नेहालय सुरुवातीपासून सहभागी आहे.

पानी फाउंडेशन स्नेहालय सोबत का काम करत आहे?

पानी फाउंडेशनचा कामाचा भर आहे तो संवादावर, कम्युनिकेशनवर. दुष्काळ-विरोधी रचनात्मक लोक चळवळ निर्माण करण्यावर. पानी फाउंडेशन गावांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत करत नाही, परंतु गावकऱ्यांना कामासाठी यंत्रांची मदत लागते. तसेच अशा गावांना आर्थिक मदत करण्यास अनेक व्यक्ति, संस्था, कंपन्या इच्छुक आहेत. या दोघांमध्ये दुवा बनून गावांना मशीनची मदत यथाशक्ती पुरवण्यासाठी स्नेहालय पुढे आली आहे. गावांना मशीन पुरवण्यास ज्यांना मदत करायची इच्छा आहे, ते येथे देणगी देऊ शकतात.

पाणलोट व्यवस्थापनाच्या कामात मशीनची गरज का आहे?

स्थानिक पाणलोट विकासाच्या कामातील बऱ्याच संरचना मानवी श्रमाद्वारे पूर्ण करता येतात, परंतु मशीन्सच्या मदतीने याच कामांची गती, श्रेणी आणि कार्यक्षमता खूप जास्त वाढते.

स्नेहालय सर्व गावांना मशीन्स पुरवेल का?

स्नेहालय त्याच गावांना मशीन्स पुरवेल जी गावे कामाची किमान पातळी (२० मार्क) पार पाडतील. जेवढ्या प्रमाणात निधी उभा राहील, तेवढ्याच प्रमाणात गावांना मशीन्स मिळतील.

२० मार्क मिळणार्या सर्व गावांना मशीन पुरवण्यासाठी जर जमा निधी पुरेसा नसेल तर स्नेहालय कोणत्या गावांना मशीन पुरवेल?

अशा परिस्थितीत स्नेहालय पात्र गावांच्या चिट्ठी बनवून लॉटने निवडेल जेणेकरून सर्व पात्र गावांना मशीन्स मिळण्यास समान संधी असेल.

मी दिलेली देणगी एखाद्या विशिष्ट गाव, तालुका किंवा जिल्हा यासाठीच वापरली जावी अशी काही व्यवस्था आहे का?

नाही.

भारताबाहेरील व्यक्ती देणगी देऊ शकतात का?

होय, परंतु भारताबाहेरील व्यक्तींनी देणगी फक्त स्नेहालयाच्या एफ.सी.आर.ऐ. खात्यावर द्यावी. देणगी देताना, दिलेली देणगी वॉटर कप गावांसाठी आहे असे स्पष्ट नमूद करावे व त्याबाबत support@snehalaya.org वर एक इ-मेल ही पाठवावा.

माझ्या देणगीबद्दल मला आयकरात सूट मिळेल का?

भारतीय आयकरदात्यांना कलम ८०-जी अंतर्गत आयकरात सूट मिळते. याकरिता ८०-जी प्रमाणपत्र हवे असल्यास कृपया support@snehalaya.org वर इ-मेल पाठवावा ज्यात पुढील माहिती देणे अनिवार्य आहे:
१. पूर्ण नाव, पत्ता, ई-मेल आणि मोबाईल क्रमांक
२. PAN नंबर
३. देणगी रक्कम

कृपया ई-मेल विषयात ‘वॉटर कप स्पर्धेतील गावांसाठी देणगी’ लिहावे.

मी स्नेहालय व्यतिरिक्त एखाद्या संस्थेला पानी फाउंडेशन मार्फत देणगी देऊ शकतो का?

नाही.

भारतीय देणगीदारांसाठी: क्रेडीट/डेबिट कार्ड, NEFT/बँक ट्रान्स्फर किंवा UPI द्वारे देणगी देण्यासाठी खालील "डोनेट" बटन दाबा. NEFT/बँक ट्रान्स्फर सोडून इतर पैसे भरण्याच्या पद्धतीसाठी किरकोळ convenience fee (जी सर्व्हिस प्रोव्हायडरला दिली जाते) आकारली जाईल.
आंतरराष्ट्रीय चलनात देणगीदेण्यासाठी किंवा धनादेश पाठवण्यासाठी येथे क्लिक करा.